Vinesh Phogat : मोठी बातमी! भारताला मोठा धक्का, विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र, कारणही आलं पुढं…


Vinesh Phogat : भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला असून भारताचा ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. विनेश फोगाटने तिचं ऑलिम्पिक मेडल गमावलं आहे. महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटातून विनेश काल फायलनमध्ये पोहोचली होती.

तिने एकाच दिवसात जगातील तीन अव्वल कुस्तीपटूना नमवलं होतं. पण विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. याच कारण आहे तिचं वजन. मर्यादेपेक्षा तिच वजन जास्त होतं. त्यामुळे विनेश फायनलसाठी अपात्र ठरली.

ऑलिम्पिक नियमानुसार, जी मर्यादा आहे, त्यापेक्षा विनेशच वजन १०० ग्रॅम जास्त होतं. नियमानुसार, कुठल्याही रेसलरला कुठल्याही वजनी गटात फक्त १०० ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त होते.

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अयोग्य ठरवण्यात आल्याची पृष्टी केली आहे. IOA ने माहिती दिलीय की, ५० किलो वजनी गटातून विनेशला अपात्र ठरवण्यात आलय. Vinesh Phogat

विनेश ओव्हरवेट झाल्याने या गटात सिल्वर मेडल कोणालाही मिळणार नाही. आता या कॅटेगरीत अमेरिकेच्या कुस्तीपटूला गोल्ड मेडल मिळेल. ऑलिम्पिकमध्ये यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!