Vinesh Phogat : ऐसी धाकड है! विनेश फोगाटची सेमीफायनलला धडक, पदकापासून एक डाव दूर..

Vinesh Phogat : भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकचा अकरावा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. अकराव्या दिवशी नीरज चोप्रानं भालाफेकच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. दुसरीकडे भारताची पैलवान विनेश फोगट हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने मंगळवारी येथे पॅरिस ऑलिम्पिकच्या प्री-क्वार्टर आणि क्वार्टर फायनल मॅच जिंकून महिला फ्रीस्टाइल ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विनेश आता तिच्या ऐतिहासिक पदकापासून फक्त एक डाव दूर आहे.
प्री-क्वार्टर फायनल सामन्यात विनेशने जपानची ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू युई सुसाकी हिला रोमहर्षक पद्धतीने ३-२ ने पराभूत केले. यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरीचा सामना युक्रेनच्या ओक्साना लिवाचवर ७-५ असा जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
उप-उपांत्यपूर्व सामन्यात, फोगट पहिल्या फेरीत ०-१ ने पिछाडीवर होती पण शेवटच्या ३० सेकंदात २- पॉइंटरने परिस्थिती तिच्या बाजूने वळवली. विनेशचे हे तिसरे ऑलिम्पिक आहे. २०२१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये, दुखापतीमुळे ती कांस्यपदक जिंकण्यापासून थोडक्यात हुकली. Vinesh Phogat
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला ५३ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत वेनेसा कलाडझिंस्कायाकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने भारताच्या रिपेचेजच्या आशा संपुष्टात आल्याने कलादझिंस्कायाचा स्पर्धेतील मुक्काम संपला.