Vinesh Phogat : सरकारची मोठी घोषणा! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यावर विनेश फोगटला लागली लॉटरी…


Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या भारताला बुधवारी मोठा धक्का बसला. फायनलपर्यंत धडक मारलेली व सुवर्ण पदकाची आशा जागवणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हीच वजन १०० ग्रॅमने वाढल्याने तिला ऑलिम्पिक मधून बाद करण्यात आले आहे.

दरम्यान, सर्व देश तिच्या कामगिरीचे कौतुक करत असतांना आज सकाळी विनेशने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भावुक पोस्ट लिहीत कुस्तीला कायमचा अलविदा करत निवृत्तीची घोषणा केली आहे.

जरी विनेश फोगट ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरली असली तरी देखील आता हरियाणा सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी विनेश फोगटला दीड कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. Vinesh Phogat

मुख्यमंत्री नायब सैनी यांनी म्हटलं की,‘हरियाणाची आमची शूर मुलगी विनेश फोगटने जबरदस्त प्रदर्शन करत पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र काही कारणांमुळे तीला अपात्र ठरवण्यात आले.

मात्र जरी तिला अपात्र ठरवण्यात आले असले तरी देखील ती आमच्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे. त्यामुळे राज्य सरकारने तिचं स्वागत एखाद्या पदकविजेत्या प्रमाणेच करण्याचा निर्णय घेतला आहे. तसचे बक्षीस म्हणून दीड कोटी रुपये देखील देण्यात येणार आहेत.’

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!