सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गावकरी भावुक, म्हणाले आमची लेक…..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या इतिहासात पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या माहेरचे गावकरी हा क्षण बघून भावुक झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या धाराशिव च्या तेर या गावातील आहेत. कुटुंबावर ओढावलेले संकट बाजूला सारून पक्षाच्या भविष्याकरिता सुनेत्रा पवार यांनी पुढे येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यानंतर आमची लेक उपमुख्यमंत्री होत आहे पण दुसरीकडे असणारा दुखाचा डोंगर ही खंत व्यक्त केली.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण पवार कुटुंबियासह सुनेत्रा पवार यांच्या माहेरची हादरून गेले आहेत. धाराशिवच्या तेर या गावातील नागरिक सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असल्याचे समजल्यानंतर भावुक झाले. त्या धाडसाने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्याआधी त्यांनी अजित पवार यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या नव्या कारकीर्दीला सुरुवात केली. राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिला महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत
