आंबळे गावातील मुलाने कमालच केली! आंतरराष्ट्रीय तायक्वोंदो स्पर्धेत दोन रौप्य पदक पटकावून गावाची मान उंचावली…
पुणे : आंबळे (ता. पुरंदर) गावात राहणाऱ्या एका मुलाने गावाची मान उंचावली आहे. कारण त्याने तायक्वोंदो या स्पर्धेत दोन रौप्य पदक पटकवले आहे. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सिध्देश नवनाथ जगताप असे या मुलाचे नाव असून पुरंदर आंबळे गावाचा तो निवासी आहे. सिध्देश शिवाजी इग्लिश मेडीयम स्कुल, सासवड येथे शालेय शिक्षण घेत आहे. सिध्देशचे वडील आर्मीमध्ये व आई गृहिणी आहे.
जागतिक तायक्वांदो कल्चर एक्सपो तायक्वांदोन – मुजू दक्षिण कोरिया या ठिकाणी तायक्वोंदो खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सिध्देश जगताप यांने सहभाग घेतला होता. त्याने या स्पर्धेत मोठे यश सपांदन करत फुमसे या प्रकारात रौप्य पदक व फाईट या प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले.
सिध्देश हा गेले दोन वर्षे सासवड येथील श्रीलक्ष्य तायक्वोंदो असोशिएशन या क्लब अतर्गंत जयदिप मंगल कार्यालय, सासवड येथे प्रशिक्षक किरण गायकवाड व माधुरी गायकवाड यांच्या मार्गदर्शानाखाली प्रशिक्षण घेत आहे.
त्याने या स्पर्धेसाठी खूप कष्ट घेतले होते. अनेक दिवस यासाठी तो सराव करत होता. त्याच्या या यशामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.