Vijay Vadettiwar : मोठी बातमी! काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही भाजपसोबत जाणार? बड्या नेत्याने थेट सांगितलं…


Vijay Vadettiwar : राज्यात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा, त्यानंतर गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला.

हे धक्के अजून पचलेले नसतानाचा आज काँग्रेसमधील आणखी एक वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसला अनेक मोठे धक्क्यावर धक्के बसत आहेत.

यामध्येच आता आमदार रवी राणा यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा येणार आहेत. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता असले तरी त्यांचं काय सुरू आहे ते मला माहीत आहे, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. Vijay Vadettiwar

मागच्या अनेक दिवसापासून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपच्या संपर्कात होते. अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक काँग्रेसचे आमदार संपर्कात आहेत. आगामी काळात एक मोठा स्फोट काँग्रेसमध्ये होईल, असा मोठा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

यामुळे चर्चांना उधाण आले आहे. रवी राणा यांनी केले सर्व विजय वडेट्टीवार यांनी खोडून काढले आहेत. आपण काँग्रेस सोडून कुठे ही जाणार नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!