Vijay Shivtare : दौंड दौऱ्यावर आलेल्या विजय शिवतरेंचा अजित पवारांवर हल्लाबोल! म्हणाले, कोयता गँग संपवण्याची भाषा करणाऱ्याचा मुलगा गुंडांच्या जवळ उभा राहतो…


Vijay Shivtare : लवकरच लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा आजच होईल अशी स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. अशी परिस्थिती असताना महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेली नसल्याची चर्चा सुरू आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीत बिघाडी पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बैठक घेत बारामती लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

शिवसेना नेते व माजी आमदार विजय शिवतारे हे शुक्रवारी (ता. १५) दौंड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक जबाबदार मंत्री आहेत, मात्र ते जाहीरपणे अनेकांना मी मोक्का कारवाईतून वाचवले असे वक्तव्य करीत आहेत. त्यांना हे शोभत नाही.

एकीकडे पुण्यातील कोयता गॅंग मी संपवून टाकील अशी भाषा करायची आणि दुसरीकडे त्यांचाच मुलगा गुंडा जवळ जाऊन उभा राहतो. ही चुकीचे आणि धोकादायक आहे. यातून अजित पवार यांची मानसिकता दिसून येते. अशी टीका पुरंदरचे माजी आमदार आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केली.

तसेच यावेळी त्यांनी दौंड तालुक्यातील यवत, चौफुला -बोरीपार्धी, वरवंड, केडगाव, पारगाव या गावात जनतेची संवाद साधला. यावेळी शिवतारे म्हणाले की, मागील ४० वर्षापासून जनता पवारांना मतदान करीत आहेत, पण त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेला काय दिले?

फक्त पाच वर्षानंतर मते मागायला ते येतात, गावागावात त्यांच्यावर जनता चिडून आहे. मला तरुण वर्गांचा मोठा पाठिंबा मिळत असून तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेऊ नका असा आग्रह ते करत आहेत.

अजित पवार यांच्या उर्मिठपणाला जनता चिडून आहे. त्यामुळे जनता त्यांना मतदानातून धडा शिकवेल. आम्हाला राज्यात 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. असे मत शिवतारे यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!