Vijay Shivtare : शिवसेनेतून बाहेर पडणार का? विजय शिवतारेंचं मोठं विधान, थेट सगळंच सांगून टाकलं…

Vijay Shivtare : अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक, शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून आपण निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत एकत्र असल्याने शिवतारेंच्या भूमिकेवर वारंवार आक्षेप घेण्यात आला.
त्यामुळे यानंतर विजय शिवतारे काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अशातच आता त्यांनी एक मोठे विधान केले आहे. विजय शिवतारे शिवसेनेतून बाहेर पडणार का?, असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यावर विजय शिवतारे यांनी मोठे विधान केले आहे.
माझा एकनाथ शिंदे यांचे घनिष्ठ नाते आहे. दोन चार महिने त्यांची अडचण झाली आहे. मला तर लोकसभा निवडणूक लढायचीच आहे. महायुतीत आपल्याला जागा तर सुटणार नाही.
त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय, २५ वर्षाची सोबत आहे ती असणार आहे ना, मी लोकसभेत विजयी होणार हे दैदिप्यमान यश असेल, असे विजय शिवतारे म्हणाले. Vijay Shivtare
माझ्यावर कारवाई होणार अशी चर्चा होती. बातम्या होत्या. बघू ना काय होते ते कपोलकल्पित विषयावर बोलणं योग्य नाही. मी लोकसभेला उभा राहणार आणि विजयी देखील होणार, आज हर्षवर्धन पाटलांना भेटणार आहे.
शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि जिंकावी. महायुतीत मी विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाग सोडवून घेतली तर मला आनंद होईल, असे विजय शिवतारे म्हणाले.