Vijay Antony Daughter : प्रसिद्ध अभिनेत्याच्या अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या, मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..


Vijay Antony Daughter : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. सुप्रसिद्ध तमिळ संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची माहिती आहे. तिच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. मनोरंजन विश्वाला यामुळे खूप मोठा धक्का बसला आहे. Vijay Antony Daughter

मीरा ही विजय अँटोनीची मुलगी आहे. हे दाक्षिणात्य मनोरंजनविश्वातील लोकप्रिय नाव आहे. माहितीनुसार, मीरा चेन्नईमधील अलवरपेट येथील घरी पहाटे ३ वाजता गळफास घेतलेल्या अवस्थेत घरातील मदतनीसला आढळून आली.

त्यानंतर तातडीने तिला एका खासगी रुग्णालयात नेलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान, ती काही दिवसांपासून तणावाखाली होती. तिच्यावर उपचार देखील सुरू होते.

विजयच्या पत्नीचे नाव फातिमा असून ती स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सांभाळते. विजय आणि फातिमा यांना मीरा आणि लारा अशा दोन मुली आहेत, त्यापैकी मीराने आत्महत्या केली आहे. मीरा ही बारावीत शिकत होती.

एवढ्या लहान वयात मीराने आत्महत्या का केली असावी? कोणत्या कारणांमुळे ती तणावात होती? असे सवाल नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर विचारण्यात येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!