Vidhansabha Election : विधानसभेसाठी सर्व इच्छुक गुंतले व्यक्तीगत सर्व्हे वाढविण्याच्या प्रयत्नात! जनतेस भेटण्यासाठी क्लुप्त्या, योजना व नवीन फंडे….


जयदिप जाधव

Vidhansabha Election  उरुळीकांचन : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यासाठी महिन्याभराचा अवधी शिल्लक राहिला आहे. प्रत्येक पक्षाने आता सर्व्हे करुन निवडणूकीचा उमेदवार ठरविण्याची रणनीती आखली आहे. या निवडणुकीत आपला झेंडा फडकविण्यासाठी उमेदवार आतानवीन क्लुप्त्या व योजना आखून वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.

काही भावनिक वातावरण तयार करीत आहेत. तर काही आपला भविष्यातील अजेंडा पुढे सरकवित आहे. या सर्व घडामोडी मतदारसंघात सुरू असून उमेदवारांच्या रुपाने पुनवेचा चांद उगू लागल्याने या सर्व सोहळ्यांनी मतदारांनी भाव दाखविण्यास सुरुवात केल्याने इच्छुकांची मतदारांनी पाठशाळा सुरू केल्याने निवडणूकीचा चांगलीच करमणूक सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता लागण्यास फक्त महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारही गावोगावी -दारोदारी जनतेच्या संपर्कासाठी उतरु लागले आहेत. काहींनी मतदारापर्यंत पोहचण्यासाठी नवीन कल्पना व क्लुप्त्या काढल्या आहेत.तर काहींनी श्रावण महिन्यांत देवदर्शनासाठी सोयकरुन दिली आहे. Vidhansabha Election

त्यामुळे जनतेलाही कधी न मिळालेले देवदर्शन घडवून देवतेला प्रसन्न करुन घेण्याची मनिषा पूर्ण होत आहे. या धामधूमीत मतदारांच्या अपेक्षा व स्वप्न दाखविण्याचा प्रयत्नांना इच्छुकांना यश मिळत असले तरी चाणाक्ष मतदारही उमेदवारांच्या प्रवासाचे मूल्यमापन करु लागल्याने मतदारराजा कसा पावतो, म्हणून आता इच्छुकांचा कस निघू लागला आहे.

निवडणूका जवळ आल्या की सर्वांना प्रथम मतदारांची आठवण सुरू होते. मग मतदान कशा रुपाने खूश होता त्याला काय पाहिजे ,अशी नवीन तजवीज आता इच्छुक आपल्या योजना आखून प्रत्यक्षात आणू लागला आहे. मात्र मतदारही पूर्ण चोखंदळ झाला असून उमेदवारांच्या पाच वर्षांच्या प्रगतीकार्डाचा अभ्यास करुन उत्तर देण्यात आता तयारीत झाला आहे.मतदारांनीही आता या सर्व इच्छुकांच्या तयारीचा जाब विचारण्याचा प्रकार सुरु केला असल्याने इच्छुकांना अवघड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

अशीच परिस्थिती आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येऊ लागली असून वर्षेनुवर्षे -महिनोन्महिने गावांचे तोंड न पाहणारे इच्छुक आता जनतेच्या दारात पोहचत आहे. रस्ते, वीज, पाणी समस्या ठिक आहेत काय? कौटुंबातील व्यक्तींची ,आजारी व्यक्तींची विचारपूस सुरू झाली आहे. सर्व समस्यांचा लवकर तोडगा काढू ,तुमची कामे झालीच म्हणून समजा असा प्रेमाचा पाझर आता फुटू लागला आहे. मात्र जनता आता या सर्व क्लुप्त्या, योजना ओळखू लागली असून जनताही आता आदर दाखवून इच्छुकांना निरोप देत असल्याने या सर्व गमतीशीर घटनांनी चर्चेला सुरुवात झाली आहे.

नेतेमंडळींमुळे इच्छुकांची अडचण?

गावकारभाऱ्यांतील नेतेमंडळींमापाठीमागे जनता राहिली नाही. या अनुभवाचे उत्तर लोकसभा निवडणुकीत मिळाले आहे.गाव नेते विरुध्य जनता असा काही सफाया जनतेने करुन टाकला आहे. परंतु अजून काही विद्वान मंडळी जनतेत आपलाच शिक्का चालतोय या अर्विभावात इच्छुकांना गोल करीत आहेत. परंतु या गाव नेत्यांचा कारवाया मात्र इच्छुकांना अडचणीत आणत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!