Vidhansabha Election : आज राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार, दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, नेत्यांची पळापळ….

Vidhansabha Election : भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे.

त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार आहे.
त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे. Vidhansabha Election

गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला होता. तेव्हाच विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार, याचे संकेत मिळाले होते. सोमवारी दुपारीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत टोलमाफीसह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले होते.
याशिवाय, आज दुपारी १२ वाजता राज्यपालनियुक्त ७ आमदारांचा विधानभवनात शपथविधी पार पडेल. यानंतर लगेच दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल.