Vidhansabha Election : राज्यात १२३ आणि १५२!! विधानसभेचा सर्वात मोठा सर्व्हे आला समोर, कोणाला बसणार फटका?


Vidhansabha Election : लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात महाविकास आघाडीनं बाजी मारली. याच पार्श्वभूमीवर राज्यात आता आगामी विधानसभा निवडणूकही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच दिसणार आहे.

दरम्यान, ऑगस्टपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण किंवा विज बिल माफी सारख्या निर्णयामुळे मतदार काही प्रमाणात महायुतीकडे झुकले होते. महायुतीला चांगल्या जागा मिळतील असे सर्वेक्षणाचे अंदाज आहे.

त्यानंतर मनोज जरांगे पाटील, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बदलापूर अंबरनाथ सारखे घटना अचानक उद्भवल्याने जनमानसावर झालेल्या परिणामामुळे महायुती पुन्हा कोमात गेली आहे तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात महाविकास आघाडीला पुन्हा एकदा लोकसभेपेक्षाही जास्त बहुमत मिळेल अशी स्थिती आहे.

या नव्या सर्वेक्षणानुसार विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विधानसभेच्या १७० जागा आहेत या ठिकाणी महाविकास आघाडी मजबूत स्थित दिसत असून भाजपला सर्वात जास्त फटका बसेल अशी चिन्हे आहेत एकूण कोकणात आणि मुंबई महानगर प्रदेशात महायुती मजबूत पकड करेल अशी स्थिती दिसत असली तरी महायुतीला सध्याच्या परिस्थितीत १२३ जागा तर महाविकास आघाडीला १५२ जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Vidhansabha Election

सर्वेक्षणानुसार विदर्भात काँग्रेसची लाट असून कापूस आणि सोयाबीन उत्पादक भाजपच्या केंद्र सरकारमधील धोरणावर नाराज असल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर भाजपला बसू शकतो. विदर्भात भाजपने बस्तान बसवले होते, मात्र यावेळीची स्थिती भाजपसाठी चांगली नाही.

तर दुसरीकडे भाजप प्रणित नेते आणि भाजपने पुढे केलेले नेते यांची अत्यंत टोकदार वक्तव्ये जनमानसात भाजपची प्रतिमा मलीन करीत आहेत. यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर भाजपला मुंबई ते फटका बसू शकतो, असाही भीतीदायक अंदाज सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. आता निवडणूक झाल्यानंतर येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!