राज्यात लव्ह जिहादने उडाली खळबळ! अत्याचाराचा व्हिडिओ, ब्लॅकमेल धर्मांतर अन् निकाह…

नगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादची धक्कादायक घटना घडली आहे. लव्ह जिहादच्या विळख्यामध्ये जिल्ह्यातील मुलगी सापडली आहे. कोपरगाव तालुक्यातील खडकीमधल्या मदरशामध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आला.
या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यात आलं, तसंच घरच्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे तरुणी धास्तावली यानंतर तिचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं.
लव्ह जिहादच्या विळख्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील मुलगी सापडली आहे. कोपरगाव तालुक्यातील खडकीमधल्या मदरशामध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आला. अनेकदा तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख खालेल्या इंदूरच्या तरुणाने मुलीला जाळ्यात ओढले. हिंदू धर्मापेक्षा मुस्लीम धर्म कसा चांगला आहे, हे बिंबवण्यात आले. धर्मांतर करून मुलीसोबत इंदूरमध्ये निकाहही करण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणी मुख्य आरोपी सायाम कुरेशी याच्यासह चार आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. इंदूरमधील दोन आणि कोपरगावमधील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी या मुलीची सुटका केली आहे. कोपरगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.