नागालँडमध्येही ‘राष्ट्रवादी चा आवाज ‘….! 2 विधानसभा मतदार संघात विजय…!

कोहीमा : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीला भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघात विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं नागालँडमध्ये मुसंडी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चैतन्याचे वातावरण आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज घुमला आहे.

नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५ विधानसभा मतदार संघात आघाडी मिळवली असून २ मतदार संघात विजय मिळवला आहे. तर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत. दरम्यान नागालँडमध्ये राष्ट्रीय संयुक्त पुरोगामी पक्षाला १० जागांवर विजय मिळाला असून एकूण १४ जागांवर आघाडी आहे. भाजपला तीन जागांवर विजय मिळाला असून ९ जागांवर आघाडी आहे.
Views:
[jp_post_view]