ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे निधन…!
पुणे : ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे आज पिंपरी चिंचवड येथे हद्यविकाराने निधन झाले.धाडसी पत्रकार म्हणून ते ओळखले जात. दोनच दिवसापूर्वी भोसरी येथील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांना भोवळ आल्याने वायसीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
‘केसरी’ साठी त्यांनी विविध पदांवर काम पाहिले. त्यांनी दीर्घकाळ पिंपरी चिंचवड मध्ये वार्तांकन केले. तसेच निर्भिड लिखाण करणारे पत्रकार म्हणून त्यांचा राजकीय वर्तुळात नावलौकिक होता. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून ते राजकीय पत्रकारिता करत होते. विधीमंडळाच्या अधिवेशनांचेही त्यांनी उत्तम वार्तांकन केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्राला धक्का बसला.
Views:
[jp_post_view]