Vasant More : राज ऐवजी वसंत मोरे उद्धव ठाकरेंना देणार साथ, ‘मातोश्री ‘ वर घेणार भेट…

Vasant More : आगामी काळात म्हणजेच साधारण ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

अशातच आता पुण्यातील वसंत मोरे आज माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मातोश्री राज दुपारी साडेबारा वाजता वसंत मोरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
वसंत मोरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते हेसुद्धा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. Vasant More

मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.