Vasant More : शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना शिक्षा, नेमकं काय म्हणाले ठाकरे?
Vasant More : लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचित गटात गेलेल्या वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी वसंत मोरेंनी शिवबंधन बांधत हाती मशाल घेतली.
वसंत मोरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वसंत मोरेंसह शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी वसंत मोरेंवर काय जबाबदारी असणार, याचीही माहिती दिली.
यावेळी, बऱ्याच दिवसांनी पाऊस आला, आणि पावसासोबत वसंतही आला, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरेंचे स्वागत केले. तर, उद्धव ठाकरेंनीही वसंत मोरेंचे पक्षात स्वागत करताना, तुम्ही सर्वजण जुने शिवसैनिक आहात, तुमचा पक्षात प्रवेश नसून स्वगृही परतत आहात.
मात्र, तुम्हाला शिवसेना सोडल्याची शिक्षा द्यायला हवी, असे म्हणत आता पुण्यात शिवसेना आणखी वाढवा, हीच जबाबदारी मी देत असल्याचे म्हटले. Vasant More
उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात बोलताना वसंत मोरेंना चिमटा काढला. शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काय मान-सन्मान मिळतो, कसा अपमान केला जातो, असे म्हणत मनसेकडून देण्यात आलेल्या वागणुकीवरुन अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
‘शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर मिळालयाच हवी, ती वसंत मोरेंनाही मिळायला पाहिजे. मी वसंत मोरेंसह तुम्हालाही शिक्षा देतोय. मला पूर्वीपेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना पुण्यात शिवसेना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.