Vasant More : पुण्याचा खासदार कोण होणार? आता होणार तिरंगी लढत, वसंत मोरे यांनी केले मोठे वक्तव्य, म्हणाले…

Vasant More : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख आता अवघ्या काही दिवसांनवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. महाराष्ट्रातही वंचित बहुजन आघाडीने नव्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली असून पुण्यातील उमेदवाराचंही नाव जाहीर करण्यात आलं आहे.
अखेर वंचितकडून पुणे लोकसभेसाठी वसंत मोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे लोकसभेत आता तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तिघेही तगडे उमेदवार असून ही लढत काहीशी अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
मात्र मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर या दोन्ही उमेदवारांपैकी वसंत मोरेंना कोणता उमेदवार जड जाणार? कोणत्या उमेदवाराकडून वसंत मोरेंना धोका आहे? असं विचारल्यास वसंत मोरेंनी पुन्हा एकदा त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले आहे. ४ जूनला सगळी उत्तरं मिळेल, असे वसंत मोरे म्हणाले आहेत.
वसंत मोरे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर असेल. दोघांची माझे सभागृहामध्ये अतिशय चांगले संबंध आणि ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मी यशस्वी करेल. ज्यांना टीका करायची ते टीका करत राहतील आणि टीका करणाऱ्यांना मला जे उत्तर द्यायचं असेल ते ४ जूनला मिळेल, असे म्हणत वसंत मोरेंनी दोन्ही उमेदवारांना थेट आव्हान दिले आहे. Vasant More
पुढे ते म्हणाले की, पुढे बोलताना ते म्हणाले की, मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जरी होतो तरी तेव्हा सुद्धा मी या उपनगराचा विकास केलेला हे संपूर्ण पुणे नाही तर महाराष्ट्राने पाहिलेले आहे.
माझा कात्रजच्या विकासाचा पॅटर्न होता तोच पुणे शहरामध्ये चालू राहील आणि मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे. पुण्याचा सर्वांगीण विकास हा माझा प्रचाराचा पहिला मुद्दा असेल. पहिल्यांदा पुण्यामध्ये जर विकासाचा कुठले काम करायचे असेल तर मी ते वाहतूक या विषयावरती करेल, असंही ते म्हणाले आहे.