Vasant More : ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर विनय भंगाचा गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी, नेमकं घडलं काय?
Vasant More : ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेले ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्याविरूद्ध पुण्यातील मनसे आक्रमक भूमिका घेतली आहे. वसंत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून सायबर कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी केली आहे.
पुण्यातील मनसेचे नेते साईनाथ बाबर, मनसे नेते बाबू वागस्कर,अजय शिंदे पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे. वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते घाणेरड्या पोस्ट केल्या आहेत. वसंत मोरे यांच्या विरोधात बोलायचं नाही, अशाच पक्षाकडून सूचना होत्या. यासंदर्भात पुणे पोलिसांचीही आम्ही भेट घेतली. Vasant More
वसंत मोरे टार्गेट करून त्यांची सोशल मीडियावरची ट्रोल आर्मी ट्रोल करत असते. माझ्या आईबद्दल, बायको बद्दल घाणेरड्या पोस्ट टाकल्यात. पैसे घेऊन वसंत मोरे यांची ट्रोल आर्मी काम करत असते. या सर्व प्रकरणामध्ये मास्टरमाइंड वसंत मोरे आहेत, असं मनसे कोथरूड विभागाध्यक्ष सुधीर धावडे यांनी सांगितले आहे.
वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी…
वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. यासंदर्भात आम्ही पोलीस आणि महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे. वसंत मोरे यांचा वसंत आर्मी असा सोशल मीडियावर ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून ते त्यांच्या विरोधकांना ट्रोल करत असल्याचं सुधीर धावडे म्हणाले.