आज्जींचा 21 वर्ष संघर्ष, वसंत मोरे यांचे फेसबुक लाइव्ह बघितले आणि त्यांचा संघर्षच संपला


पुणे : पुण्यातील पुष्पा राठोड यांचे पती अरविंद राठोड यांनी पुणे मनपात ४० वर्षे सेवा प्रदान केली. पण, सेवानिवृत्तीनंतर त्यांना पेन्शन मिळाली नाही. त्यासाठी अरविंद यांनी महापालिकेविरोधात संघर्ष केला. पुष्पा राठोड यांचा हा संघर्ष मनपाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये त्यांचा संघर्ष चालू होता.
त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. यात मनसे नेते वसंत मोरे यांच्या फेसबूक लाईव्हने महत्त्वाची भूमिका निभावली. पेन्शनचा 2003 पासून रखडलेला फरक वसंत मोरे यांच्या फेसबुक लाईव्हने मिळवून दिला.

21 वर्ष संघर्ष करणाऱ्या आजीला दहा लाख 37 हजार 666 रुपयांचा धनादेश मिळाला. पुण्यातील अरविंद राठोड यांच्या पत्नी पुष्पा राठोड गेल्या दहा वर्षापासून सरकारी कार्यालयात हेलपाटे मारत होत्या.
२०१३ ते २०२३ पर्यंत आजीची पेन्शन त्यांना देणार आहे. २१ वर्षे उंबरठे झिडवावे लागले. पण, वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचा संघर्ष कामी आला. कारण त्यांनी वसंत मोरे यांचे फेसबूक लाईव्ह पाहिले. त्यातून त्यांनी वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला. वसंत मोरे यांनी पाठपुरावा करून त्यांनी पेन्शन मिळवून देण्यात यश मिळवले.
यामध्ये त्यांना मनपाच्या काही अधिकाऱ्यांनी मदत केली. यामुळे आता त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार आहेत.