Vasant More : पुण्याच्या राजकारणात खळबळ!! जीवे मारण्याच्या धमकीमागे कुणाचा हात? वसंत मोरेंनी थेट मनसे नेत्याचे नाव घेतलं…


Vasant More : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांना सातत्याने फोनवर जीवे मारण्याची धमकी येत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच मनसेचा कार्यकर्ता असल्याचे अज्ञात धमकी देणारा इसम आपली ओळख सांगत आहे.

या धमकी देणाऱ्यामागे नेमकं कोण आहे? असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारला असता त्यांनी पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे नाव घेतले आहे. या संदर्भात मी कायदेशीर कारवाई केली आहे.

या सर्व घटनांमागे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हेच आहेत, असे वसंत मोरे स्पष्ट म्हणाले आहेत. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

वसंत मोरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून हे सर्व प्रकार सुरू झाले. हा धमकीचा फोन मला पंधरा दिवसांपूर्वी आला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी एक व्यक्ती मला दिवसभरात १५ ते २० वेळा कॉल करत होती आणि फोन केल्यानंतर तो काहीच बोलत नव्हता, थेट शिवीगाळ सुरू करायचा. शेवटी मी त्या व्यक्तीचा नंबर ब्लॅक लिस्ट केला, तरी तो व्यक्ती नंबर बदलून वारंवार फोन करून शिवीगाळ करत होता, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.  Vasant More

शेवटी त्या व्यक्तीने माझ्या फोनवर फोन करून मला दम असेल तर कात्रज चौकामध्ये येण्यास सांगितले. मी तात्काळ माझा भाचा प्रतीक कोडीतकर याला यासंदर्भात सांगितले.

त्यानंतर प्रतीक कोडीतकर यांनी त्या शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला फोन केला आणि कात्रज बस स्टॉपवर गेला. मात्र त्या ठिकाणी शिवीगाळ करणारी व्यक्ती नव्हती. कात्रज बस स्टॉप जवळ बोलावले. म्हणजे ती व्यक्ती मला चांगले ओळखते, असे वसंत मोरे म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!