वारीशे यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजितच, आरोपीने केला धक्कादायक खुलासा…!


मुंबई : काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत शंकर वारीशे यांचा अपघात झाला होता. पत्रकार वारीशे यांची मुख्यमंत्री शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसजी आपल्यासोबत कुणाचे फोटो? शहानिशा कराच, पंतप्रधान मोदीजींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ‘बॅनर’वर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो, रिफायनरी विरोधी शेतकऱ्यांचा सनसनाटी आरोप, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती.

असे असताना काही तासांतच पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघाती मृत्यू झाला. अपघात झाला ती गाडी जिल्ह्य़ात प्रस्तावित केलेल्या तेल शुद्धीकरण कारखान्याचा समर्थक आंबेरकर याची होती. तेव्हापासून मृत्यू अपघाती झालेला नसून, ही ठरवून करण्यात आलेली हत्या असल्याचा आरोप होत आहे.

आता त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. विरोधी पक्षांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले असून या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली.यादरम्यान या प्रकरणात आता मोठा खुलासा समोर आला आहे.

वारीसे यांच्या मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा सध्या पोलिस कोठडीत आहे. आता आंबेकर यांनी वरीशे यांच्यावरील हल्ला हा पुर्वनियोजित असल्याचे मान्य केले आहे.

आंबेरकरला अटक केलेल्या राजापूर पोलिसांनी बुधवारी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आह. सुरुवातीला आंबेरकर याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबतच आंबेरकर याने पत्रकार वारीशे यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कृत्य असल्याचे मान्य केले आहे.

तसेच आम्हाला त्याचे बँक खाते तसेच कॉल रेकॉर्डचे तपशील मिळाले आहेत. या कृत्यात आणखी काही लोक गुंतले आहेत का हे तपासण्यासाठी आम्ही त्याची छाननी करत आहोत. असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!