Vanraj Andekar : पुणे शहरात वनराज आंदेकर गोळीबार हत्याप्रकरणी पोलीसांनी तिघांना केली अटक..

Vanraj Andekar : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाळून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली. या घटनेत वनराज आंदेकरांचा मृत्यू झाला असून कौटुंबिक वाद आणि पैसे यावरून हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.
वनराज आंदेकर हत्याप्रकरणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात काल रात्री वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून कोयत्याने वार करुन खून केला होता. वनराज आंदेकर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. Vanraj Andekar
नेमकं घडलं काय?
एका टू व्हीलरवरुन दोघं जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली आहे. गोळीबार करून कोयत्याने वार देखील करण्यात आले आहेत. दरम्यान हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती.
शिवाय आपल्यामध्ये एकजूट असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला केलाय. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
त्यानंतर कोयत्याने वार केले. दरम्यान, पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगार डोकं वर काढताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांची भीती कुठे राहिली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.