Vanraj Andekar : वनराज आंदेकर हत्या प्रकरण मोठी माहिती समोर, बहिणीनेच काढला भावाचा काटा, तुला पोरं बोलवूनच…


Vanraj Andekar : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाळून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली. या हल्ल्यामागे दुसरा तिसरा व्यक्ती नसून वनराज आंदेकर यांची सख्खी बहिण आणि मेव्हणा जयंत कोमकर असल्याची माहिती समोर आली आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी पुण्यातील नाना पेठेत हत्या झाली. रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये वनराजच्या सख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. Vanraj Andekar

नेमकं घडलं काय?

आरोपींचे रविवार (ता.१) रोजी आकाश परदेशी याच्याशी काही कारणांवरुन वाद झाले होते. या संदर्भात आरोपी तक्रार देण्याकरीता समर्थ पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी शिवम आंदेकर व वनराज आंदेकर हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले.

तेथे आरोपी संजीवनी व जयंत कोमकर यांनी आकाश परदेशीला मारहाण केली. हे भांडण शिवम आंदेकर यांनी सोडवले. त्यावेळी बहिण संजीवनी हिने भाऊ वनराज आंदेकर यांना ‘वनराज… आम्ही तुला जगु देणार नाही. तु आमच्यामध्ये आला आहेस.

तु आमचे दुकान पाडण्यास सांगुन आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला आज पोर बोलावुन ठोकतेच.’ अशी धमकी दिली. आणि त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले आहे. त्यात एकूण १२ हल्लेखोर चार ते पाच गाड्यांवर आल्याचे दिसत आहे. गाडीवरुन उतरताच वनराज आंदेकर यांच्या दिशेने त्यांनी गोळीबार सुरु केला. आंदेकर जखमी होताच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!