Vanraj Aandekar : वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुजेट समोर, धक्कादायक माहिती आली समोर…


Vanraj Aandekar : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाळून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली. या घटनेत वनराज आंदेकरांचा मृत्यू झाला असून कौटुंबिक वाद आणि पैसे यावरून हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.

याप्रकरणी आता पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. वनराज आंदेकर हल्लेखोरांना पाहताच पळू लागले. परंतु गाडीवरुन उतरत हल्लेखोरांनी गोळीबार सुरु केला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात १२ हल्लेखोर दिसत आहे. त्यात काही जणांकडे शस्त्र आहे.

पुणे पोलिसांनी या हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुजेट जारी केले आहे. त्यात पाच ते सहा गाड्यांवर १२ युवक सोबत आलेले दिसत आहे. ते गाडीवरुन उतरुन वनराज आंदेकर यांच्या दिशेने जाऊ लागले. आपल्यावर हल्ला होणार हे कळताच आंदेकर जीव वाचवण्यासाठी पळू लागले. Vanraj Aandekar

त्यावेळी एका हल्लेखोरांची गोळी त्यांच्या कानाजवळून गेली. आंदेकर रक्तबंबाळ झाल्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळावरुन फरार झाले. चित्रपटात ज्या पद्धतीने गुंड हल्ला करुन पसार होतात, तिच पद्धत हल्लेखोरांची दिसली.

दरम्यान, वैयक्तिक वैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. कारण वनराज आंदेकरच्या टोळीचा नाना पेठ परिसरात बराच वावर आहे. तो गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा होता.

घरगुती वादातून घडलेल्या या खुनाच्या घटनेला बंडू आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर जबाबदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही वर्षांपूर्वी गणेश कोमकर याने शिवसेनेचे शहरप्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावरही ॲसिड हल्ला केल्याचा आरोप केला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!