Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला ३ नव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा, जाणून घ्या…
Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.३१) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेन्समुळे उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कनेक्टिव्हिटी वाढेल. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीनही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे.
यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “वंदे भारत गाड्यांचा विस्तार हा आधुनिकता आणि गतीसह विकसित भारताच्या ध्येयाकडे आपल्या देशाची प्रगती दर्शवितो. या तिन्ही ट्रेन मेरठ – लखनौ, मदुराई – बेंगळुरू आणि चेन्नई – नागरकोइल दरम्यान धावतील.
पुढे बोलताना ते म्हणाले, चेन्नई-नागरकोइल मार्गावर, विद्यार्थी, शेतकरी आणि आयटी व्यावसायिकांना खूप फायदा होईल. जिथे जिथे वंदे भारतची सुविधा पोहोचली आहे तिथे पर्यटकांची संख्या वाढली आहे, याचा अर्थ व्यवसाय आणि दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत, विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांचा जलद विकास महत्त्वाचा आहे. Vande Bharat Train
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, ” दक्षिण भारतात अफाट प्रतिभा आणि संसाधने आहेत. त्यामुळे, तामिळनाडू, कर्नाटक आणि संपूर्ण दक्षिणेचा विकास आमच्या सरकारसाठी प्राधान्य आहे. गेल्या १० वर्षांतील या राज्यांमधील रेल्वे विकासाचा प्रवास याचा पुरावा आहे.
या वर्षीच्या अर्थसंकल्पात, आम्ही तामिळनाडूच्या रेल्वे अर्थसंकल्पासाठी ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केली आहे. हा अर्थसंकल्प २०१४ च्या तुलनेत सात पटीने जास्त आहे. तामिळनाडूमध्ये सहा वंदे भारत गाड्या सुरू आहेत आणि आज ही संख्या आठपर्यंत पोहोचेल. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
गाड्यांचे मार्ग आणि वेळ काय?
मेरठ शहर – लखनऊ वंदे भारत प्रवाशांना दोन शहरांमधील सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत सुमारे एक तास वेळेत बचत होईल. त्याचप्रमाणे, चेन्नई एग्मोर – नागरकोइल वंदे भारत आणि मदुराई – बेंगळुरू वंदे भारत या गाड्या अनुक्रमे २ तास आणि सुमारे १ तास ३० मिनिटांपेक्षा जास्त बचत करतील.