Vande Bharat Train : अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर-पुणे वंदे भारत दाखवला हिरवा झेंडा, प्रवाशांना होणार फायदा…


Vande Bharat Train : आज देशाला सहा वंदे भारत एक्स्प्रेस मिळाले आहे. त्यातील एक आपल्या महाराष्ट्रासाठी असून कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी ६ वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला.

यात नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे, आग्रा कँट ते बनारस, दुर्ग ते विशाखापट्टणम, पुणे ते हुबळी आणि वाराणसी ते दिल्ली पहिल्या २० डब्यांच्या वंदे भारत रेल्वेचा त्यात समावेश आहे.

पीएम मोदींनी आज भूज ते अहमदाबाद पहिल्या वंदे मेट्रोलाही हिरवा झेंडा दाखवला. कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा आज (ता.१६) शुभारंभ झाला. सव्वाचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधून ऑनलाईन पद्धतीने तर रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा प्रत्यक्ष उपस्थित राहून कोल्हापूर स्थानकातून या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

कोल्हापूर स्थानकावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. काही दिवसांपासून कोल्हापूर-मुंबई मार्गावर ‘वंदे भारत’ सुरू व्हावी, अशी मागणी होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर – पुणे वंदे भारत आठवड्यातून दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी तर पुणे-कोल्हापूर या मार्गावर दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे.

दरम्यान, याचा ऑनलाईन शुभारंभ झाला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. याचवेळी कोल्हापूर स्थानकावरही रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांनी झेंडा दाखवला. यावेळी खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कोयना एक्स्प्रेसची वेळ बदलणार..

कोल्हापूर-पुणे वंदे भारत सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे. याचवेळी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेसही सुटते. या दोन्ही गाड्यांची सुटण्याची वेळ आता एकच होणार आहे. यामुळे कोयना एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ दहा ते पंधरा मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे.

याचा प्रवाशांना फायदा होणार आहे. कोयना एक्स्प्रेसची वेळ वाढवली तरी मिरजेपासून पुढील वेळापत्रकावर परिणाम होणार नाही, प्रवासाचा कालावधी तोच राहील, या द़ृष्टीने कोल्हापूर-मिरज मार्गावर गाडीचा वेग किंचित वाढवला जाण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!