वंदे भारत- राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल 500 रुपये वाचणार, 90 टक्के लोकांना ट्रिक माहिती नाही,जाणून घ्या….

पुणे: भारतीय रेल्वेत आत्ताच्या घडीला वंदे भारत सर्वात लोकप्रिय ट्रेन आहे.वंदे भारत एक्सप्रेस येण्यापूर्वी राजधानी एक्सप्रेसची क्रेझ मोठी होती, पण आता तिचं स्थान वंदे भारतने घेतलं आहे. मात्र या दोन्ही ट्रेनचं एक साम्य आहे व ते म्हणजे दोन्हीही प्रीमियम श्रेणीतील गाड्या असल्याने त्यांच्या तिकिटांचे दर सर्वसामान्य प्रवाशांसाठी थोडे महाग वाटतात. मात्र आता वंदे भारत,राजधानी, शताब्दी यासारख्या प्रीमियम ट्रेनच्या तिकिटात तब्बल पाचशे रुपयापर्यंत बचत केली जाऊ शकते. पण त्यासाठीची ट्रिक 90% लोकांना माहिती नाही. त्या ट्रिक्स चा वापर करून कमी किमतीत रेल्वेचे तिकीट काढले जाऊ शकते.

काय आहे ही ‘ट्रिक’?

या ट्रेनमध्ये प्रवाशांना खानपान सेवा मिळते. म्हणजेच तुम्ही बुकिंग करताना रेल्वे तुमच्यासाठी नाश्ता, जेवण किंवा चहा देण्याचा खर्च तिकिटातच समाविष्ट करते. पण हे सर्व प्रवाशांसाठी अनिवार्य नाही. म्हणजेच, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही “No Food” हा पर्याय निवडू शकता.तिकीट बुकिंग करताना तुम्ही तुमचं नाव, वय, प्रवासाचे ठिकाण इत्यादी माहिती भरल्यानंतर खाली “Other Preference” असा विभाग दिसतो. तिथेच तुम्हाला “I don’t want Food/Beverages” हा पर्याय मिळतो.

     
   
हा पर्याय निवडताच रेल्वे तुमच्या तिकिटाच्या एकूण किमतीतून खानपान सेवांचा खर्च वजा करते.यामुळे तुमचं तिकीट ३०० ते ५०० रुपयांनी स्वस्त होतं. काही प्रवासांमध्ये हा फरक आणखी जास्त असतो.
‘No Food’ पर्यायाबद्दल गैरसमज
अनेक प्रवाशांना वाटतं की राजधानी, शताब्दी आणि वंदे भारतमध्ये खानपान सेवा अनिवार्य आहे आणि ती नाकारता येत नाही. मात्र हे पूर्णपणे चुकीचं आहे.भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की “No Food” हा पर्याय अजूनही तिकिट बुकिंगच्या पानावर उपलब्ध आहे. म्हणजेच, तुम्ही जेवण नको असल्याचं स्पष्ट केल्यास, रेल्वे तुमच्याकडून त्या सेवेचे पैसे घेणार नाही.
मग प्रवासी का देतात अनावश्यक पैसे?
अनेकांना हा पर्याय माहित नसल्यामुळे ते तिकिट बुक करताना डिफॉल्ट सेटिंगवरच राहतात आणि आपोआप खानपान सेवा समाविष्ट होते.त्यामुळे त्यांना जेवण हवं नसलं तरीही त्याचे पैसे भरावे लागतात.
परिणामी रेल्वेचे तिकीट बुक करताना तुम्ही तीनशे ते पाचशे रुपये बचत करू शकतात असे सांगितले जात आहे.अनेकांना रेल्वेतील जेवण, खानपान सेवा रुचत नाही, पैसे घेऊनही चांगला नाष्टा -जेवण देत नसल्यामुळ प्रवासी तक्रारी करत असतात.. मग अशा परिस्थितीत ५०० रुपये वाचवून स्वतःचं स्वच्छ व चविष्ट अन्न खाणं हा अधिक चांगला पर्याय ठरतो.
रेल्वेचे प्रयत्न काय?
रेल्वे प्रशासनाने या तक्रारींवर लक्ष देऊन सेवा पुरवठादार कंपन्यांवर अनेक नियम लागू केले आहेत. गुणवत्तेत सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण प्रवाशांना स्वतःचा पर्याय निवडण्याची मोकळीक कायम दिली आहे.
 
				
