पुण्यात फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडचं संपत्तीचं घबाड!! करोडोंची डोळे टिपवणारी संपत्ती आली समोर, सहा आलिशान ऑफिस अन्…; ईडी कारवाई करणार?


पुणे : गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हे नाव चर्चेत आलं आहे. आता त्याच्या टोळीची मोठी संपत्ती असल्याचे समोर येत आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराड आणि टोळीने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर एका इमारतीत वाल्मिक कराड, त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आल्या आहेत. पंचवीस कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने या इमारतीत या ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डरसोबत करार केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी त्याचे मगरपट्टा सिटीत देखील फ्लॅट असल्याचे सांगितले जात होते. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा अतिशय विश्वासू म्हणून तो ओळखला जातो. सत्तेच्या या जवळीकीचा उपयोग करत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवली आहे.

पुण्या-मुंबईसह अनेक शहरांमध्ये वाल्मिक कराड आणि टोळीने उद्योग आणि व्यवसायांमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप होत आहे. तसेच अनेक महत्त्वाच्या ठिकाणी त्याने अनेक प्रकारे जवळच्या व्यक्तींच्या नावे संपत्ती घेतल्याचे देखील सांगितले जात आहे. यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत.

दरम्यान, वाल्मिक कराडला मकोकाच्या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. वाल्मिक कराड आणि टोळीची दहशत कायमस्वरूपी संपवायची असेल तर त्यांच्या या अशा आर्थिक स्तोत्रांवर कारवाई होण्याची गरज आहे. राज्यभरात याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता ईडीकड़े या टोळीच्या मालमत्तांचा तपास सोपवला जाऊ शकतो असं बोललं जातंय. संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेल्या आठ जणांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!