मी वाल्मिक कराड, न्यायदेवता देईल ती शिक्षा….! स्वतःच व्हिडिओ काढत पोलिसांना शरण, केलं मोठं वक्तव्य, राज्यात खळबळ

पुणे : गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत वाल्मिक कराड याने आपण सरेंडर करणार असल्याची माहिती दिली आहे.

वाल्मिक कराड याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आपला काहीही सहभाग नसल्याचे कराडने स्पष्ट केले. आपल्यावर असलेल्या खंडणीच्या गुन्हा प्रकरणी पाषाण रोड सीआयडीकडे सरेंडर होत असल्याचे वाल्मिक कराड याने व्हिडीओत म्हटले. यामुळे आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. त्यांना अटक का केली जात नाही? असा सवाल राज्यभरातून उपस्थित केला जात असतानाच आता या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे.

नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वाल्मिक कराड अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे. तो आज शरण आल्याची माहिती देण्यात आली आहे. सीआयडीसमोर वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्याचे सांगितले जात आहे. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या प्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याने विडिओमध्ये मोठं वक्तव्य केले आहे. माझा न्यायदेवतावर विश्वास आहे, मला देईल ती शिक्षा मी भोगेल, असेही त्याने म्हटले आहे. यामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत.