वाल्मिक कराड करोडपती!! चौकशीत सगळी काळी कमाई उघड, एसआयटीच्या तपासात करोडोंची मालमत्ता झाली उघड, वाचा लिस्ट….


Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडभोवती कायद्याचा फास आता आणखी घट झाला आहे. कराडची संपूर्ण संपत्तीची माहिती घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. वाल्मीक कराडची राज्यभर असलेली कोट्यावधींची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी कडून हालचाली सुरू झाली आहे.

अशातच आता विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत कोट्यवधींच्या मालमत्तांची माहिती हाती लागली आहे. शेती, प्लॉट, गाळे, स्टोन क्रशर युनिट आणि अनेक कोटींच्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टीचा समावेश असलेल्या या मालमत्तांची यादी समोर आली आहे. SIT ने ही संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

SIT च्या अहवालानुसार, २०२० ते २०२४ दरम्यान वाल्मिक कराड आणि त्याच्या कुटुंबाने विविध ठिकाणी जमीन, गाळे आणि स्टोन क्रशर खरेदी केले. तसेच, काही मालमत्तांचे गहाणखतही करण्यात आले आहे.

वाल्मिक कराडच्या संपत्तीची यादी..

केज शहर- २५०० चौरस फूट क्षेत्रातील आरसीसी बांधकाम (१.६९ कोटींना खरेदी – २९ नोव्हेंबर २०२४)
दगडवाडी शेतजमीन – (४८.२६ लाख – ३१ जानेवारी २०२०)
मौजे तडोळी जमीन -१२ हेक्टर (५.८४ लाख – १० जानेवारी २०२३)
परळी वैजनाथ तालुका जमीन -३ हेक्टर ११ आर (२५.३५ लाख – ८ जुलै २०२४)

गहाणखत ठेवलेल्या प्रॉपर्टी …

धाराशिव जनता सहकारी बँक (१३ डिसेंबर २०२३) – ५ कोटी५० लाखांसाठी काही मालमत्तांचा गहाणखत
रेसिडेन्शियल प्रॉपर्टी – अंबाजोगाई रोड, परळी
ओपन लँड प्रॉपर्टी – पांगरी, बीड

कराडच्या पत्नी आणि मुलाच्या नावावर संपत्ती..

पत्नी मंजिरी कराड – वडगाव, परळी येथे जमीन १३.१५ लाख – ११ जुलै २०२४)
मुलगा श्री गणेश कराड – शिरसाळा गावातील प्लॉट (७.४० लाख – ३ जानेवारी २०२३)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!