Uttarkashi Tunnel Rescue : अमेरिकेतून आणलेले मशीन बिघडले, आता हाताने होणार खोदकाम, उत्तरकाशीमधील परिस्थिती बिघडली…
Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्कियारा बोगद्यातून ४१ कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या १४ दिवसांपासून हे कामगार बोगद्यात अडकले असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकेतून आणलेले ऑजर मशीनही निकामी झाले आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत, ऑगर मशीन चांगले काम करत होते, सुमारे ४७ मीटरपर्यंत ड्रिलिंगचे काम पूर्ण झाले होते, परंतु मध्येच ते सोडले. त्याचे अनेक भाग आतून खराब झाले आहेत.
लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी सांगितले की, सरकारकडे उपलब्ध असलेल्या सर्व यंत्रणांकडून मदत घेतली जात आहे. ते म्हणाले की, ऑगर मशीन आतापर्यंत ते चांगले काम करत होते मात्र काही भाग तुटला आहे, तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, हवाई दलाकडून उचलून नवीन कटिंग मशीन पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑगर मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर बचाव पथक आता ४७ मीटरनंतर हाताने खोदण्याची तयारी करत आहे. Uttarkashi Tunnel Rescue
यामध्ये एक किंवा दोन अभियंते पाईपद्वारे आत जातील आणि हात आणि लहान मशीनच्या मदतीने पुढील खोदकाम करतील. अशा स्थितीतही बराच वेळ जाईल. अता हसनैन यांनी म्हटले आहे की, आम्ही आता ज्या पद्धती वापरत आहोत त्यांना वेळ लागेल, त्यामुळे संयम बाळगण्याची गरज आहे. ते म्हणाले की, ऑगर मशीनचा वापर आता हाताने खोदल्यानंतर पाईप ढकलण्यासाठी केला जाईल.