Uttarkashi Tunnel Rescue : बोगद्यातील ४१ कामगार लवकरच बाहेर येणार, ऑगर ड्रीलिंग मशीन पुन्हा एकदा सुरू

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठीचे मदतकार्य अंतिम टप्प्यात आले असून आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास यश येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्याला वेग आला असून, कामगारांना बाहेर काढण्याची मोहीम शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच हे कामगार सुखरूप बाहेर येतील. अशी आशा असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री धामी म्हणाले, पीएम मोदी बचावकार्यात येणाऱ्या अडचणींबद्दल सर्व अपडेट्स घेत आहेत. तसेच उपायांवर अधिकाऱ्यांशी चर्चाही करत आहेत. दरम्यान या मोहिमेत केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व एजन्सी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. ४१ कामगारांच्या बचाव कार्यासाठी एकत्र काम करत आहोत. Uttarkashi Tunnel Rescue
आम्हाला आशा आहे की, हे ऑपरेशन लवकरच पूर्ण होईल आणि सर्व कामगार लवकरच बाहेर येतील, असेही धामी म्हणाले. तसेच कामगारांना वाचवण्यासाठी आणि रुग्णालयात नेण्यासाठी २५ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. २० रुग्णवाहिका डेहराडूनहून उत्तरकाशीसाठी दुपारीच वाजता रवाना झाल्या असून, ज्या उत्तरकाशीतील चिन्यालीसौरला पोहोचल्या आहेत.
बचावकार्याबाबत माहिती देताना तांत्रिक, रस्ते आणि वाहतूकीचे अतिरिक्त सचिव महमूद अहमद यांनी म्हटले आहे की, बिघाड झालेले ऑगर ड्रिलिंग मशीन पुन्हा जोडण्यात आली आहे. वेल्डिंगनंतर बोगद्यात नवीन पाईप टाकण्यात आली आहे. या प्रक्रियेला आणखी दोन तासांचा कालावधी लागणार असून, आता कोणताही अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही, अशी आशा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कामगारांना वाचवण्यासाठी आणि रुग्णालयात नेण्यासाठी २५ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. २० रुग्णवाहिका डेहराडूनहून उत्तरकाशीसाठी दुपारीच वाजता रवाना झाल्या असून, ज्या उत्तरकाशीतील चिन्यालीसौरला पोहोचल्या आहेत.