Uttar Pradesh : भयंकर घटनेचा न्यायालयाने दिला निकाल! मुलं होण्यासाठी अल्पवयीन मुलीची हत्या करून काळीज खाल्लं, झाली जन्मठेपेची शिक्षा…

Uttar Pradesh उत्तर प्रदेश : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.
तसेच महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते.
एका मुलीची हत्या करून तिचे काळीज बाहेर काढून खाणाऱ्या जोडप्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेत दाम्पत्याला मदत करणाऱ्या दोन आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी १४ नोव्हेंबर २०२० रोजी, कानपूरच्या घाटमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील भद्रस गावात ही घटना घडली होती. Uttar Pradesh
मिळालेल्या माहिती नुसार , दिवाळीच्या दिवशी ही निष्पाप पिडीत मुलगी गावातील दुकानात फटाके आणण्यासाठी गेली होती. तेथून ती अचानक बेपत्ता झाली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह शेतात विकृत अवस्थेत आढळून आला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला.
पोलिसांनी गावातील अंकुल कुरील आणि वीरन कुरील या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, जे काही समोर आलं ते ऐकून पोलीसही चक्राऊन गेले होते. त्यामुळे परिसरासह राज्यात मोठी खळबळ उडाली होती.
नेमकं प्रकरण काय?
पिडीत मुलीचे काका परशुराम आणि त्याच्या पत्नीनं मुलाच्या हव्यासापायी तांत्रिकांच्या सांगण्यावरून अंकुल आणि वीरन यांना पैसे देऊन मुलीची हत्या केली होती. एवढेच नाही तर त्यांनी मुलीचं काळीज देखील खाल्लं होतं, तांत्रिकाने त्यांना सांगितले होते की, जर तुम्ही मुलीच काळीज खाल्लं तरच तुम्हाला मुलगा होईल.
धक्कादायक म्हणजे मुलीच्या हत्येपूर्वी अंकुल आणि वीरन यांनी दारू पिऊन निष्पाप चिमुरडीवर बलात्कार देखील केला. . यानंतर तिचे काळीज काढून परशुरामला देण्यात आले होते. सध्या कानपूर देहात येथील न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती.
दरम्यान, तीन वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर शनिवारी न्यायालयाने आरोपी दाम्पत्य परशुराम आणि सुनैना यांना जन्मठेप आणि प्रत्येकी २०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच अंकुल आणि त्याचा साथीदार वीरेन यांना जन्मठेप आणि प्रत्येकी ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.