हाय हिल्स वापरा वेदनेशिवाय..!
पुणे : चित्रपटामध्ये किंवा जाहिरातीमध्ये अनेक स्टार्स अभिनेत्री हाय हिल्स घातलेल्या आपण पाहतो. हाय हिल्स घालून डान्स करणाऱ्या अभिनेत्री पाहून आपल्याला नेहमीच आश्चर्य वाटतं. कारण आपण हाय हिल्स घातल्या तर आपल्या पाठीला आणि टाचांना, पायांना त्रास होतो. अनेकदा हाय हिल्स घालून फजिती होते. बऱ्याचदा पाय मुरगाळतो किंवा पाय घसरून पडण्याची भीती ही सतत असते.
त्यापेक्षा आपण शूज किंवा चप्पल आपल्याला सूट होईल अशी वापरतो. फॅशन करण्यापेक्षा आपण आरामदायी चप्पल किंवा शूज निवडतो. जे आपल्याला दिवसभर वापरता येतील आणि आपल्याला काही त्रासही होणार नाही. आज बाजारात तुमच्या पायांना आराम देतील आणि पाय घसरणार नाही अशा हिल्सच्या चप्पल आणि शूज उपलब्ध आहेत. पावसाच्या दिवसांत या हिल्स कशा वापरायच्या हे पाऊस बघूनच ठरवा.
जाड हिल्स: आज मोठ्या आणि जाड हिल्सवाल्या चप्पल आणि शूजची फॅशन आहे. पेन्सिल हिल्स स्टायलिश दिसतात; मात्र त्यामुळे अनेकदा पाठीचं दुखण सुरू होतं. त्यापेक्षा या हिल्स तुम्ही वापरू शकता आणि त्या आरामदायी ही आहेत. ऑफीस वेअर आणि इतर ठिकाणी वापरायलाही या हिल्स तुम्हाला चालू शकतील.
सोल तपासून घ्या : हिल्स वापरताना चप्पल किंवा शूजचा सोल कसा आहे हे तपासून घ्या. चांगल्या हिल्स आणि चांगला सोल असं समीकरण बऱ्याचदा जुळत नाही. तेव्हा सोल नक्की तपासा. तुमच्या पायाचं आणि टाचेचं दुखनं सोलमुळेच सुरू होत असतं. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
लोकांचा विचार करू नका : तुम्ही कोणती चप्पल किंवा शूज वापरताय यापेक्षा त्याने तुमच्या पायांना आराम मिळतो आहे की नाही ते बघा. लोकांचा विचार करू नका. हिल्स घालून पाय अवघडले असतील तर थोडा वेळ चप्पल पायातून काढून ठेवा आणि मोकळे करा.
आता थोडे हटके : मुरूम हटवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स
– कडुलिंबाची साल उगाळून मुरमांवर लावल्यास मुरमे कमी होतात.
– जायफळ गायीच्या दुधात उगाळून मुरमांवर लावावे.
– हळद-बेसनाचे उटणे बनवून चेहऱ्यावर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.
– कडुलिंबाच्या पानांच्या चूर्णात मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करावी व चेहऱ्यावर लावावी.
– कडुलिंबाची मुळी उगाळून मुरमांवर लावल्यासही ती नाहीशी होतात. – काळी माती मुरमांवर घासून लावल्यानेही ती नष्ट होतात.
– जांभळाची बी पाण्यात उगाळून चेहऱ्यावर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.