उरुळी कांचनला दोन किलो चरस हस्तगत ; अहमदनगर हून विक्रीसाठी आलेला सराईत गुन्हेगार अटकेत …!


उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सुमारे २४ लाखाच्या दोन किलो चरसची विक्री करणासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.

औरंगजेब पप्पू अन्सारी उर्फ रंगा परदेशी (वय-२७, रा. दर्गा दर्या रोड, मुकूंदनगर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अहमदनगर हून उरुळी कांचन येथे चरस विक्री करण्यासाठी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली विरोधी पथकाने उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पांढरस्थळकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून अन्सारी हा रस्त्यावर काळ्या रंगाची सॅक घेऊन उभा असलेला दिसून त्याच्या बॅगेत बॅगमध्ये २४ लाख रुपये किंमतीचे दोन किलो चरस, मोबाईल आढळून आले.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण , एस.डी. नरके पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, संदीप जाधव, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, साहिल शेख, संदिप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझीम शेख, नितीन जगदाळे आणि दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!