महामार्गावर उभ्या कंटेनरला कंटेनरने ठोकरले ; कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू ! उरुळी कांचनला अपघाताने पोलिस यंत्रणेची उडाली तारंबळ …!

उरुळी कांचन : महामार्गावर बिघाड होऊन उभ्या असलेल्या कंटेनरला पाठिमागून कंटेनरने जोरदार धडक देऊन कंटेनर दुभाजक ओलंडून विरुद्ध दिशेच्या महामार्गावर उभ्या केलेल्या कारवर कंटेनर आदळून झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) शुक्रवार (ता.१७) शहरात पहाटे चार वाजण्याच्या घडली आहे.
या अपघाताने तब्बल ५ तास वाहतुक कोंडीचा खोळंबा उडून वाहचालकांना मोठा मनस्ताप परिस्थिती उद्भवली होती.विकास सुरेंद्र (वय ३६ रा. रायपूर , छत्तीसगड )असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कंटेनर चालकाने नाव आहे.
या अपघातात राष्ट्रीय महामार्गालगत व्यावसायिकाच्या कार कंटेनर आदळून चक्काचूर झाली आहे. या अपघात घडल्यानंतर पोलिसांना ५ तास प्रयत्नांची शर्थ करुन महामार्गावरील अवजड साहित्य व वाहने हटविण्यास परिश्रम घ्यावे लागले आहे. सकाळी १० नंतर सर्व वाहतुक सुरळीत करण्यात पोलिसांना यश मिळाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर( एम एच ४० सीडी. ४०८५ ) हे अवजड साहित्य घेऊन वाहन हे सोलापूर दिशेने जात होते. यादरम्यान उरुळी कांचन हद्दीत महामार्गावर बिघाड होऊन उभ्या असलेल्या कंटेनरला हा कंटेनर ने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनर दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला व्यावसायिकाच्या कार वाहनात घुसला या अपघातात कंटेनर चालक विकास सुरेंद्र हा जागीच ठार झाला.
अपघाताची माहिती मिळताच, कस्तुरी प्रतिष्ठान चे कार्यकर्त्यांनी सर्व अपघात ग्रस्तांना बाहेर काढले. मात्र या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झाला होता. हा अपघात घडल्यानंतर सर्व वाहने , साहित्य हे महामार्गावर पडल्याने तसेच मार्गांवर इधन सदृश वस्तू सांडल्याने पोलिसांनाया ठिकाणी वाळू मिश्रित मातीचा खच मार्गावर टाकावा लागला. त्यामुळे प्रवासी वाहने घसरू नये म्हणून काळजी घ्यावी लागली.
लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे हवालदार बाळासाहेब पांढरे, महेश करे, किशोर कुलकर्णी, रमेश गायकवाड यांनी या पथकाला वाहतुक सुरळीत करण्यासहीत अवजड साहित्य महामार्गावरुन हटविण्यास मोठी मेहनत घ्यावी लागली.