नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उरुळी कांचनच्या अकॅडमीचा डंका ; 17 पैकी 17 विद्यार्थी पदकविजेते ; भाजपकडून पदकविजेत्यांचा सत्कार …


दिल्ली : दिल्ली अलीपूर येथे झालेल्या नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उरुळी कांचन व पंचक्रोशी भागातील निर्माण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत यश मिळवत डंका वाजवला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या संघातील विविध जिल्ह्यामधील अनेक टीम सहभागी झाल्या होत्या. मात्र महाराष्ट्रातला दुसरा क्रमांक मिळण्यात उरळीकांचन येथील निर्माण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा राहिला आहे. अकॅडमीतील एकूण 17 विद्यार्थी स्पर्धेसाठी क्वालिफाय झाले होते आणि विशेष म्हणजे सर्वच 17 विद्यार्थी पदकविजेते ठरले आहेत.या भव्य यशानंतर विजयी विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला

पदक विजेत्यांची नावे व मिळालेली पदके

1.गोल्ड पदक विजेते शिवराज निकम, समर्थ कांचन, हरमन सिंग

2.सिल्वर पदक विजेते विवेक पांडे, श्लोक कुंजीर, आयुष प्रसाद, फैजान शेख, आदित्य चव्हाण, लोकेश जगदाळे, श्रीवर्धन कदम, रितेश चव्हाण, श्रीतेज कांचन, आर्या भाटे

3.ब्राँझ पदक विजेते
सार्थक मचाले, समर्थ मचाले, सोहम शिंदे, यशराज बडेकर

उरुळी कांचनमध्ये महाराष्ट्र टीममधील सर्व विद्यार्थ्यांचीं गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. प्रशिक्षक व निर्माण अकॅडमीचे संचालक संदीप कांचन, प्रशिक्षक शकील शेख व फरदीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कठोर सराव करून हे यश मिळवले.त्याबद्दल शहर भाजपच्या वतीने,विकास जगताप, श्रीकांत कांचन,तसेच पदाधिकाऱ्यांकडून या बाल,खेळाडूंकडून सत्कार करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!