Uruli Kanchan : कत्तलखान्यात गायींना घेऊन जाणारा ट्रक पाठलाग करुन पकडला! उरुळीकांचन पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल…
Uruli Kanchan उरुळी कांचन : सोलापूर ते पुणे रोडने पुणेकडे अवैधरीत्या कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून उरुळी कांचन येथील तरुणाच्या सतर्कतेमुळे ८ गायींची सुटका केली आहे. याप्रकणी उरुळी कांचन येथे जनावरे घेऊन निघालेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकचालक रणजीत बाळू (खाडे,रा.पिंपरी सांडस,ता.हवेली,जि.पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. राहूल चंद्रकांत बारंगळे (वय-२८ वर्षे ,रा.तुपे वस्ती,ऊरूळी कांचन,ता.हवेली, जि.पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी (ता.२८) रात्री १२.३० वजनाच्या सुमारास फिर्यादी यांना ट्रक मधून बेकायदेशीरपणे कत्तल करणेसाठी जनावरे भरून ती गाडी सोलापूर ते पुणे रोडने पुणे कडे जात आहे अशी माहीती मिळाली.
त्यानंतर फिर्यादी यांनी गोरक्ष यांचेसह लागलीच ऊरूळी कांचन येथे साखरे पेट्रोलपंपाजवळ (ता.२८) रोजी रात्री १२.४५ वाजणाच्या सुमारास फिर्यादी यांनी आलो व ट्रक थांबवून खात्री केली असता त्यामध्ये एकूण लहान मोठी ०८ गायी होत्या.
त्यानंतर, फिर्यादी यांनी चैकशी केल्यानंतर त्यांची खात्री झाली की, सदरची जनावरे ही रात्रीचे वेळी त्यांना चारा पाण्याची सोय न करता त्यांचा छळ करून दोरीने बांधून त्यांची कत्तल करणेसाठीच पनवेल नवीमुंबई येथे घेऊन चालले आहेत.
त्यानंतर फिर्यादी यांनी डायल११२ वर काँल केला त्यानंतर थोड्या वेळात पोलीस आले व त्यांनी सदरचा ट्रक हा पोलीस स्टेशनला घेऊन आले, सदरची गाडी थांबविण्यासाठी फिर्यादी यांना गोरक्षक रोहीत तात्यासो केदारी, आकाश प्रभाकर, प्रशांत राजेंद्र लोंढे यांनी मदत केली आहे. Uruli Kanchan
त्यानंतर पोलीसांनी व फिर्यादी यांनी सोबतचे हजर असलेले गोरक्षक यांची खात्री झाली की, ट्रकमधून वाहून नेत असलेली गायी ह्या त्यांची कत्तल करणेसाठीच पनवेल नवीमुंबई येथे घेऊन चालले होते.
दरम्यान, सर्व ०८ गायींपैकी एक गाय ही काळे पांढरे रंगांची,एक गायी तांबड्या रंगांची व सहा गायी पाढरे रंगाच्या आहेत.तसेच त्या सर्व गायांची अंदाजे किंमत
८० हजार रुपये किंमत जप्त करण्यात आली आहे. राहूल चंद्रकांत बारंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ट्र्क चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.