Uruli Kanchan : उरुळीकांचन पोलिसांनी दहशत माजविण्याऱ्यांची मोडली मांड! सहा जणांवर खूनाचा प्रयत्न व दहशत माजविण्याचे गंभीर गुन्हे केले दाखल…


Uruli Kanchan उरुळीकांचन : पूर्ववैमनस्यातून ५ ते ६ जणांच्या टोळक्याने तोंडाला कापड बांधून मोबाईलच्या दुकानाची नासधूस करुन तोडफोड केल्याची घटना उरुळीकांचन येथे घडल्यानंतर उरुळीकांचन पोलिसांनी रात्री सहा जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या कायदेशीर कलमांनी गुन्हेगारांचा चांगलाच अटकाव करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याने नागरीकांनी समाधान मानले आहे.

पूर्ववैमनस्यातून थेट मोबाईल दहशत माजवून फोडल्याचा प्रकार उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील महात्मा गांधी रस्त्यावर घडला होता. या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे बाहेर काढण्याचा गुन्हेगारी घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता. परिसरात भयभितता पसरेल अशा या दहशती कृतीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र उरुळीकांचन पोलिसांनी या प्रकारावर कडक कारवाईचे धोरण अवलंबून या गुन्हेगारांवर खूनाचा प्रयत्न दहशत माजविणे, मालमत्ता नुकसान, शांततेचा भंग करणे अशा गुन्हे दाखल करुन आरोपींची मांड मोडण्याची कारवाई केली आहे.

रोहित कुंजीर व भरत कुंजीर (रा.वळती ,ता.हवेली ,जि.पुणे ) असे गुन्हे दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. आणखी चार आरोपींची नावे निष्पन्न करण्याची कारवाई सुरू आहे. तर अक्षय हनुमंत कुंजीर (वय-३०, रा. वळती, ता. हवेली ,जि. पुणे) असे तक्रार केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी बी.एन.एस.का कलम १०९, १८९ (२), १९०, १९१(२), ३२४(४), ३३३ , ३५१(२), ३५१(३)३५२ व शस्र परवाना कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून अक्षय कुंजीर व रोहित कुंजीर याचा गावातीलच काही तरुणांशी वाद झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी झाला आहे. या वादाचा बदला म्हणून तक्रारदार अक्षय कुंजीर यांच्या मोरया मोबाईल शॉपीत अज्ञात ५ ते ६ जण घुसून त्यांनी कोयते व हत्यारे घेऊन दुकानात शिरले व दुकानात मोबाईल साहित्य व फर्निचर या साहित्याची मोडतोड करुन हे सर्व जण तक्रारदार याला धमकावून पसार झाले आहेत .

कायदा सुव्यवस्था बिघडविण्याची कोणतीही कृती पोलिस खपवून घेणार नसून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येतील  – शंकर पाटील, पोलिस निरीक्षक

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!