Uruli Kanchan : उरुळी कांचन परिसरात गुटख्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल…
Uruli Kanchan : उरुळी कांचनसह परिसरात उरुळी कांचन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुटख्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच याप्रकणी टेम्पोच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई रविवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन गावच्या हद्दीतील दत्तवाडी परिसरातील संदीप सुभाश कांचन यांच्या राहत्या घराजवळ, आडोशाला करण्यात आली आहे. पोलिसांनी एका टेम्पोसह १३ लाख ८१ हजार १३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मालक समीर जयसिंग कांचन (रा. जय मल्हार रोड, उरूळी कांचन, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पोच्या मालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार रमेश सोमनाथ भोसले यांनी फिर्याद दिली आहे. Uruli Kanchan
मिळालेल्या माहिती नुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत गुटख्याची वाहतूक करणारे वाहन जाणार असल्याची माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सापळा रचून टेम्पो व त्याच्या चालकाला ताब्यात घेतले.
या वेळी वाहनांची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यानुसार बेकायदा गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह सुमारे १३ लाख ८१ हजार १३८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.