उरुळी कांचन येथे ग्रामनिधीतून रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यासाठी नागरिकांचे ग्रामपंचायतीच्या समोर आंदोलन…!
उरुळी कांचन : रस्त्याची २३ नंबरमध्ये नोंद करून रस्त्याचे ग्रामनिधीतून कॉक्रिटीकरण करून नागरिकांच्या समस्या दुर करण्यासाठी पिराचा मळा परिसरातील नागरिकांनी उरुळी कांचन ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज (ता. १७) आंदोलन केले आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग ५ येथील एम. जी. रोड ते अनिल यादव घर (मणिभाई विहीर परिसर) ओढा शेजारील रस्त्याचे ग्रामनिधीतून कॉक्रिटीकरण करून नागरिकांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाकडे जाण्यासाठी उरुळी कांचन येथील एम. जी, रोडपासून ओढ्याच्या डाव्या बाजूने महात्मा गांधी विद्यालयाच्या भिंती शेजारील, पूर्वीपासून वहिवाटीमध्ये असणाऱ्या एम. जी रोड ते अनिल / विकास यादव घर) रोडच्या कॉक्रिटीकरण होण्याच्या संदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायत उरुळी कांचन प्रशासनाकडे अर्ज केला होता.
त्या अनुषंगाने ग्रामपंचायतकडून या रोडच्या कॉक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. परंतु काल (ता. १६) वाजण्याच्या सुमारास बाजूला जमीन क्षेत्र असलेल्या राजेंद्र विठ्ठल कांचन यांनी त्यांचा ओढ्याच्या डाव्या बाजूला असलेला सदर रस्त्याशी संबंध नसताना पाच काम करणाऱ्या कामगारांना दमदाटी करत रस्त्याचे काम बंद पाडले आहे.
रस्त्याचे कॉक्रिटीकरण करून वस्तीतील नागरिकांसाठी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय गरजेची बाब आहे. पावसाच्या दिवसांमध्ये सदर रस्त्याने चालता येत नही मोठ्या प्रमाणावर दुर्गधी व आरोग्याच्या समस्या उद्भवतात. वस्तीमध्ये एखादी मयत झाले किंवा कोणी आजारी पडल्यास रुग्णवाहिका सदर ठिकाणे पोहचत नाही.
दरम्यान, सदर रस्त्याची २३ नंबरमध्ये नोंद करून ग्रामनिधीतुन लवकरात लवकर कॉक्रिटीकरण करूप देण्यासंदर्भात आम्ही वस्तीतील सर्व नागरिक आपणास विनंती करत आहोत, तरी आपणही याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सदर जनहिताचा प्रश्न सोडवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना सरपंच राजेंद्र कांचन म्हणाले, “ग्रामपंचायतीच्या वतीने पाचशे रुपयांच्या स्टॅम्प देण्यात आला आहे. तसेच तो रोड सर्वात पहिल्यांदा २३ नंबर मध्ये ओढण्यात आला आहे. येणाऱ्या २३ तारखेच्या बैठकीत या रस्त्यावर ग्रामनिधीतून फंड टाकण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.