Uruli kanchan : उरुळी कांचन पोलिसांची मोठी कारवाई! गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा, पांढरस्थळ परिसरातील दोघांवर गुन्हा दाखल…

Uruli kanchan : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक परिसरातील हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्या दोघांवर उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून गावठी हातभट्टीची ४० हजार ७०० रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे.
ही घटना सोमवारी (ता. २२) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पांढरस्थळ परिसरातील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. Uruli kanchan
याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार किरण जगन्नाथ शेलार यांनी फिर्याद दिली आहे. अंकुश लक्ष्मण खलसे, अशोक खलसे (दोघेही रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक परिसरात गावठी हातभट्टीची दारू विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. Uruli kanchan
त्यानुसार पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता अंकुश खलसे व अशोक खलसे यांच्याजवळ २० हजार रुपयांचे कच्चे रसायन, २० हजार रुपयांचे जळके रस, रसायन व इतर साहित्य असा ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले आहे.
दरम्यान, या प्रकरणी अंकुश खलसे व अशोक खलसे यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. या घटनेचा पोलीस तपास हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहेत.