पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन पोलिसांची दमदार कामगिरी! दोन वाहनांसह तब्बल ११ लाखांची गावठी दारू हस्तगत..

उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे – सोलापूर महामार्गावर गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर धडक कारवाई केल्याचे समोर आली आहे. दोन वाहनांसह तब्बल ११ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता.०४) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. या दोन्ही वाहनातील दोन्ही चालक फरार झाले असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार रमेश भोसले गस्त घालीत असताना त्यांना एका खबऱ्याने माहिती दिली की, उरूळी कांचन हद्दीत हायवेवर गावठी हातभट्टी दारूची वाहतुक करीत असलेल्या एका पिकअपचा टायर फुटला आहे.

सदर पिकअप मध्ये हातभट्टीची तयार दारू आहे. व सदर वाहनातुन दुसरे एका वाहनात पिकअप मधील दारूचे कॅन भरत आहेत अशी माहीती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने रमेश भोसले यांनी तात्काळ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना माहिती देऊन सदर ठिकाणी दोन पंचासह छापा कारवाई केली.
पोलीसांना पाहताच दोन्ही वाहन चालक वाहने जागेवर सोडुन अंधारात पळुन गेले. यावेळी पथकाने सदर वाहणाची पाहणी केली असता पिकअप मध्ये १ लाख ४० हजार रुपये किमतीची गावठी तयार दारू, पाच लाखांचे पिकअप व दुसऱ्या वाहनात ७३ हजार ५०० रुपयांची दारू व ४ लाख रुपयांचा एक मारुती कंपनीचा टेम्पो असा ११ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलीस हवालदार सुनील वाघमारे यांनी जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, सहायक फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार सुनिल वाघमारे, पोलीस अंमलदार रविकुमार फड, अशिष उल्हाळकर, ऋषीकेश रासकर, धनंजय भोसले यांचे पथकाने केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार रमेश भोसले हे करीत आहे.
