Uruli Kanchan : नैसर्गिक विधी करताना डूकरांचा हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू, उरुळी कांचन येथील घटनेने खळबळ..


Uruli Kanchan : सकाळच्या प्रहारी नैसर्गिक विधी आटोपण्यासाठी काटवाणात गेलेल्या ५० वर्षीय व्यक्तीवर डूकरांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एकाच मृत्यू झाला आहे.

हि घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सायरस पूनावाला शाळेजवळील परिसरात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

बापु सिताराम खामगळ (वय.४५, रा. आश्रम रोड उरुळी कांचन ता. हवेली) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर ठिकाणी उरुळी कांचन पोलिसांनी भेट दिली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

सविस्तर माहिती अशी की, बापू खामगळ हा मिळेल ते काम करीत होता. सकाळच्या पहारी नैसर्गिक विधी आटोपण्यासाठी काटवाणात गेला होता. सायरस पुनावाला शाळेजवळ पीरसाहेब दर्गा जवळ एका इसम पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली.

ड्रामायन, घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी पाहणी केली असता यावेळी बापु खामगळ याची अवघड जागा व पाठीमागील जागा हि डूकरांनी खाल्ली असल्याचे दिसून आले.

त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा जागेवरच मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरु आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!