Uruli Kanchan News : ड्रायव्हरने राहत्या घरी संपवले आयुष्य, सोरतापवाडी येथील घटना, कारणही आलं समोर…

Uruli Kanchan News : एका ३६ वर्षीय ड्रायव्हरने राहत्या घरात राखाडी रंगाच्या ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोरतापवाडी (ता. हवेली) येथून समोर आली आहे.
ही घटना रविवारी (ता.०५) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे.
विनोद बळीराम गायकवाड, (वय. ३६, धंदा. ड्रायव्हर, मुळ रा. लाखी-बुकी, ता. परांडा, जि.धाराशिव, सध्या रा. लाड वस्ती, सोरतापवाडी, ता हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी कौशल्या हनुमंत गायकवाड (वय.५४ धंदा मजुरी, मुळ रा-लाखी-बुकी, ता. परांडा, जि. धाराशिव, सध्या रा. महादेवनगर सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. Uruli Kanchan News
सविस्तर माहिती अशी की, विनोद गायकवाड हे परिवारासह सोरतापवाडी परिसरात राहतात. विनोद हे चारचाकी गाडी चालवून उदरनिर्वाह करीत होते. त्यांचे पत्नी सोबत किरकोळ भांडण झाले होते. शनिवारी (ता. ०४) संध्याकाळी झोपण्यासाठी ते त्यांच्या खोलीत गेले होते.
रविवारी सकाळ झाली तरी बाहेर न आल्याने खिडकीतून पाहिले असता राखाडी रंगाच्या ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक काळे करीत आहेत.