Uruli Kanchan News : उरुळीकांचन मध्ये साकारला ‘इस्त्रो’ चा चंद्रयान -३ मोहिमेचा देखावा! ग्रामीण भागातील मंडळाच्या कल्पकतेला प्रेक्षकांची पसंती ..!!
Uruli Kanchan News उरुळी कांचन : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवून भारताने जगाला आपल्या आधुनिक प्रगतीच्या सामर्थ्याचे दर्शन घडविले आहे. या मोहिमेने जगात भारताची मान उंचावली आहे. भारतीय अंतराळ संशोधन परिषद (इस्त्रो ) ने केलेल्या कामगिरीचा संपूर्ण भारतीयांना गर्व आहे. याच कामगिरीचा देखावा उरुळी कांचन( ता.हवेली) येथील महात्मा गांधी तरुण मंडळाने उभारत गणेश भक्तांसाठी अभिमानाची पर्वणी ठरवली आहे. Uruli Kanchan News
उरुळी कांचन (ता.हवेली) येथील आश्रम रोडवरील महात्मा गांधी तरुण मंडळाने इस्त्रो ने केलेल्या चंद्रयान -३ मोहिमेचा हलता देखावा सादर केला आहे. मंडळाने चंद्रयान – ३ देखाव्याची संकल्पना मांडत या मोहिमेचे भारतीयांसाठी प्रतिबिंब कसे आहे हे दाखवून दिले आहे. या देखावा मंडळाच्या सर्व सभासदांनी स्वतः बनवला आहे.
देखाव्यातील चांद्रयान ४५ फूट उंच आहे आणि २० फूट उंच प्रतिकृती देखावा म्हणून बनवण्यात आली आहे. त्यामुळे हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेला रोवर बनवला आहे, विक्रम लॅंडर लँड झाल्यानंतर तो चंद्रावर जसा फिरतो तसा फिरत असताना दाखवला आहे. हा देखावा बनवताना देखाव्यासाठी लागणारे डिझायनिंग अल्टिमेट डिझानिंग बनवले आहे.
इस्रोने चांद्रयान मोहीम मोहिम यशस्वी करताना खडतर आव्हाने घेऊन पूर्ण केले. या कथेची माहिती देखाव्यात देण्यात आली आहे. इस्रोने चांद्रयान १ पासून चांद्रयान ३ पर्यंतचा प्रवास कसा केला, हे देखील या देखाव्यातून सांगण्यात आले आहे.
भारताने चंद्रयान ३ ही मोहीम यशस्वी केली. भारत, रशिया, चीन आणि अमेरिका हे देशही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा प्रयत्न करतायेत. या सगळ्यांआधी भारत तिथे पोहोचला, हे भारताचे हे अभूतपूर्व यश आहे. भारताने चांद्रयान – ३ मोहिमेच्या निमित्ताने जगात इतिहास घडवला आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. त्यामुळे जगभरात भारताची शान वाढली आहे.
चांद्रयान तीन मोहीम इसरोने यशस्वीरित्या पार पाडली आणि अवघ्या जगभरात भारताचे कौतुक झालं. आता हेच चांद्रयान गणेशोत्सवात देखावा म्हणून घराघरात बघायला मिळत आहे. घरगुती गणपतीपासून ते ग्रामीण मंडळाचे गणपती चांद्रयानचा देखावा सादर करत आहेत.