Uruli Kanchan News : उरुळीकांचन येथील बॉक्सिंग सितारा राष्ट्रीय पातळीवर चमकणार! उत्कर्ष बडेकर याची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड..!!

Uruli Kanchan News : उरुळी कांचन : अकोला येथे झालेल्या सबज्युनिअर (१४ वर्षाखालील ) महाराष्ट्र राज्य निवड बॉक्सिंग चाचणी स्पर्धेमध्ये उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उत्कर्ष शक्ती बडेकर या विद्यार्थ्यांने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्याची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघात राष्ट्रीय पातळीवर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
अकोला येथे नुकतीच महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १४ वर्षाखालील महाराष्ट्र राज्य संघात स्थान मिळविण्यासाठी राज्यभरातू़न ४५० जिल्हापातळीवर यश संपादन केलेले स्पर्धत निवड चाचणीत सहभागी झाले होते.
उत्कर्ष हा ६७ ते ७० वजनगटात स्पर्धतून निवड होण्यासाठी सहभागी झाला होता. त्याने निवड चाचण्यांत स्पर्धकांवर मात करीत त्याने राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी निवडल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघात स्थान मिळविले आहे. Uruli Kanchan News
उत्कर्ष शक्ती बडेकर हा इयत्ता ८ वी इयत्तेत शिक्षक घेत असून तो अभिमन्यू स्पोर्टस् अँकॅडमी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. उत्तर प्रदेश , नोएडा येथे होणाऱ्या ३ ऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी तो महाराष्ट्र संघाकडून खेळणार आहे.
आता त्याने या स्पर्धेत खेळण्यासाठी कसून सराव सुरू केला आहे. ग्रामीण भागातून राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड होणे अतिशय कौतुकास्पद बाब असल्याने त्याचा या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.