Uruli Kanchan News : सरपंचाला शिवीगाळ, ग्रामपंचायतीची तोडफोड, लोणी काळभोरमध्ये एकावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Uruli Kanchan News : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढत चालेले आहेत.
सध्या अशीच एक घटना (ता. हवेली) येथून समोर आली आहे. तरडे (ता. हवेली) ग्रामपंचायतीने वतनामधील जागेवर अंगणवाडी बांधकामाच्या नोंदी केल्याच्या रागातून एका तरुणाने सरपंचाना शिवीगाळ करून ग्रामपंचायतीच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे.
ही घटना गुरुवारी (ता. ०७) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सरपंच अभिषेक प्रभाकर दाभाडे (वय -२४, रा. सदर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ बजरंग गायकवाड, (ता. तरडे, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, गुरुवारी (ता. ०७) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गावातील इसम सिद्धार्थ गायकवाड याने वतनामधील जागेवर ग्रामपंचायतीमार्फत अंगणवाडीच्या बांधकामाच्या नोंदी केल्याचा राग मनात धरून गायकवाड याने सरपंच दाभाडे यांना शिवीगाळ केली व ग्रामपंचायतीवर दगडफेक केली. Uruli Kanchan News
दरम्यान, यावेळी तरडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या शासकीय इमातीच्या समोरील काचा फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.