Uruli Kanchan News : आमच्या मॅटरमध्ये लक्ष घातलं तर बघ!! उरुळी कांचन येथे एकाला मारहाण, गुन्हा दाखल…


Uruli Kanchan News : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहे. सध्या अशीच एक घटना उरुळी कांचन (ता. हेवली) येथून समोर आली आहे.

आमच्या मॅटरमध्ये तू लक्ष घालू नको, असे म्हणत चौघांनी एकाला हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटनाउघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतिल लक्ष्मीमाता मंदीरासमोर उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घटना घडली आहे. या प्रकरणी चौघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश तुकाराम मोरे (वय. ४४, व्यवसाय मजुरी रा. एम. जी. रोड बरूड हाइटस, उरुळी कांचन ता. हवेली) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सार्थक जाधव व सौरभ जाधव (पुर्ण नाव माहीत नाही, रा. दोघेहि बुरूड हाइटस एम. जी. रोड उरूळी कांचन ता. हवेली), व आणखी अनोळखी दोन इसम नाव पत्ता माहीत नाही यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Uruli Kanchan News

मिळलेल्या माहिती नुसार, माहितीनुसार, अविनाश मोरे हे कुटुंबासमवेत उरुळी कांचन येथील परिसरात कुटुंबासहित राहतात. शुक्रवारी (ता. ८) रात्री १० वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले असता त्याच्यासमोर राहणारा सार्थक जाधव याने बाहेर बोलावून तुझ्याकडे काम आहे, असे म्हणून बोलावून घेतले.

या वेळी शेजारी असणारे लक्ष्मी माता मंदिर येथे थांबलो असता त्याचा भाऊ, सौरभ जाधव हा आणखी २ मुलांसह तेथे आला. मानलेली भाची वैष्णवी मोहिते यांच्या मॅटरमध्ये तू लक्ष घालू नको, असे म्हणून सौरभ जाधव याने हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

या वेळी सार्थक याने तेथे पडलेले लाकूड डोक्यात पाठीमागून मारले. तसेच इतर दोन अनोळखी लोकांनी हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. मोरे यांच्यावर उरुळीकांचन येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!